गांधीजींचे व्यक्तिमत्त्व, गांधीविचारांचे काही पैलू, यावर प्रकाश टाकणाऱ्या या पहिल्या खंडात, सर्वच अभ्यासकांनी गांधींचे व्यक्तित्व आणि विचार यांचे केवळ आकलनच मांडले नाही, तर गांधी विचारांच्या प्रस्तुततेचेही अधोरेखन केले आहे!
जवळजवळ पाच पिढ्यांमधल्या अभ्यासकांच्या लेखांचा यात समावेश आहे. टिळक-टागोरांची एक पिढी, नेहरू-आचार्य भागवत यांची एक पिढी, कुरुंदकर-पळशीकर यांची एक पिढी, चौसाळकर-सुमंत यांची एक पिढी व आताची चैत्रा रेडकरांची पिढी. पहिल्या मराठी गांधी चरित्राला टिळकांनी प्रस्तावना लिहिल्याला शंभर वर्षे होऊन गेल्यावरही गांधींचे व्यक्तित्व, गांधीविचार अभ्यासकांना खुणावत आहे, चिकित्सेचा मोह घालत आहे.......